वेळेनुसार जशा तारखा बदलतात तसचं गरजेनुसार लोकांची बोलण्याची पद्धत बदलत राहते.
@suvichar_marathi
एक वेळ आपल्याकडे जवळची व्यक्ती नसेल तर त्रास होत नाही पण जर जवळची असून सुद्धा नसल्यासारखी वागत असेल तर मात्र खूप त्रास होतो.
@suvichar_marathi
जीवनात ज्यांना जीवन म्हणजे काय हे समजलं ते त्यांच्या जवळ काही नसतानाही आनंदी राहतात पण ज्यांना जीवनाचा अर्थच समजला नाही ते त्यांच्याजवळ सर्व काही असतानाही दुःखी असतात.
@suvichar_marathi
निःशब्द होण्याची वेळ तेंव्हाच येते, जेंव्हा हृदयातील भावना आणि डोक्यातील विचारांची सांगड बसत नाही.
@suvichar_marathi
सगळेच सुंदर असतात कोणाचे विचार, कोणाचे गुण, कोणाचं रूप पण आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्वाचं असतं देवाने प्रत्येकाला सुंदरच बनवलं आहे.
@suvichar_marathi
या जगात प्रत्येक माणूस हा समुद्रासारखा खोल आहे आणि त्याचे मन अनेक रहस्यांनी भरलेले आहे तुम्ही कीतीही म्हणलं की मी समोरच्याला पूर्णपणे ओळखले आहे पण तसं कधीच नसतं.
@suvichar_marathi
आदर आणि विरोध या दोन्ही गोष्टी तुम्हाला करता यायला हव्या कारण आदर तुमच्यातली नम्रता, संस्कार दाखवतात तर विरोध तुमच्यातली जागरूकता दाखवतात.
@suvichar_marathi
चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नका. कारण ते पाऱ्यासारखे असतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता, तेव्हा ते तुटले जात नाहीत पण शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात.
@suvichar_marathi
परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टीची लाज आणि जास्त मिळालेल्या गोष्टीचा माज कधीच वाटत नाही.
@suvichar_marathi
ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसे बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवतात.
@suvichar_marathi
मराठी सुविचार pinned «📢आता मिळवा मराठी भाषेतील नवनवीन सुविचार तुमच्या WhatsApp वर 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VabXxlS29757O2YjRl2T»
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
@suvichar_marathi
जग काय म्हणेल याचा विचार करु नका कारण लोक फार विचित्र आहेत अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात.
@suvichar_marathi
फळ देणारे झाड आणि गुणवान व्यक्तिच फक्त झुकतात सुकलेले झाड आणि मुर्ख व्यक्ति कधीच झुकत नाही.
@suvichar_marathi
काही लोक शब्दांचे जाळे असे काही विणतात की खोट्या गोष्टीही खऱ्या वाटू लागतात अशा व्यक्ती खरं ते माझं म्हणण्यापेक्षा माझं तेच खरं म्हणत असतात आणि चांगल्या व्यक्तीही यांना बळी पडतात.
@suvichar_marathi
लोकांनी सर्व तुमचेच ऐकावं आणि तुमचंच बरोबर मानावं हा अट्टाहास कधीच करायचा नाही आपण फक्त आपली सत्याची बाजू मांडायची ज्यांना पटेल त्यांना पटेल ज्यांना नाही पटेल त्यांना नाही पटेल.
@suvichar_marathi
बुद्धिमत्ता तुम्हाला सर्वोच्च पदावर नेऊन पोहोचविते तेथे किती काळ टिकून रहायचे हे मात्र तुमचे वर्तन ठरवित असते.
@suvichar_marathi
एखाद्याला आपली किंमत कळाली नाही म्हणून नाराज नाही व्हायचं कारण भंगार व्यापाऱ्याला हिऱ्याची पारख नसते.
@suvichar_marathi
जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलुन घ्या, कारण पुर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणं जास्त सोपं आहे.
@suvichar_marathi
#Ad
📢आता मिळवा मराठी भाषेतील नवनवीन सुविचार तुमच्या WhatsApp वर
👇👇
https://whatsapp.com/channel/0029VabXxlS29757O2YjRl2T
2024/06/29 04:18:12
Back to Top
HTML Embed Code: