Telegram Group Search
एक नवउद्योजक... तरुण वय... त्याच्या एका कस्टमरकडे त्याची भली २०-२५ लाख रुपये उधारी थकलेली. वर्षभर झाले तरी उधारी देईना, कॉल ला प्रतिसाद देईना...

शेवटी या नवउद्योजकाने आपल्याकडे काम करणाऱ्या पाचसहा जणांना घेऊन त्या ग्राहकाचे ऑफिस गाठले, सोबत लोखंडी रॉड घेऊन गेले. तिथे समोरासमोर थोडे वादविवाद झाले. याने लगेच आपल्या माणसांच्या सोबतीने त्या ऑफिसमधल्या सगळ्यांना रॉड, पाईपने मारहाण करायला सुरुवात केली. ऑफिसमध्ये कामासाठी मुली सुद्धा होत्या. सगळाच गोंधळ.

त्या ग्राहकाने पोलिसांना बोलावले. याच्यावर आणि याच्या कार्यकर्त्यांवर खंडणी, दरोडा, विनयभंग असे बरेच गुन्हे दखल झाले. हे पाच सहा जण थेट जेलमधे... नवउद्योजकाचा व्यवसायाचा मोबाईल सुद्धा जप्त झाला... वर्षभर आतमध्ये... मोबाईल जप्त असल्यामुळे संपर्क ठप्प, इकडे व्यवसाय सांभाळायला कुणी नाही. घरातल्यांनी व्यवसाय हाताळण्याचा प्रयत्न करून पहिला, पण त्यांना जास्त काही जमले नाही. थोडेफार जमले तरी कामाचा मोबाईल, गाडी जप्त असल्यामुळे आणि हा स्वतःच आत असल्यामुळे ७०-८०% व्यवहार ठप्प झाले.

वर्षभरानंतर बाहेर आल्यावर आता व्यवसाय तसाही संपल्यात जमा आहे. उधारी तशीच गेली, ती आता वसुलीच्या बाहेर गेली आहे... नवउद्योजक आता म्हणतोय, भाऊ व्यवसायात संयम पाहिजे...

१. उधारी वसुलीचे कौश्य असेल तरच उधारी करावी. मार्केटमध्ये ८०% व्यवहार उधारीचेच आहेत, त्यामुळे त्याला आपण टाळू शकत नाही. पण उधारी करताना समोरच्या ग्राहकाची मार्केट मधील प्रतिमा सुद्धा तपासून घेणे आवश्यक असते. यासोबतच चांगले संबंध ठेवणे, पाठपुरवठा करणे अशा गोष्टींची आवश्यकता असते.
२. उधारी वसूल होत नसल्यास कायदेशीर कारवाईचा पर्याय असतो. (उधारी संबंधी उद्योजक मित्र च्या वेबसाईटवर एक दोन लेख आहेत)
३. मोठ्या उधारीवेळी चेक घेऊ ठेवता आल्यास उत्तम
४. उधारी वसुलीचे सर्व व्यावसायिक मार्ग संपल्यानांतर सुद्धा समोरचा प्रतिसाद देत नसेल तर त्याचा उद्देश उधारी फेडण्याचा नाही हे लक्षात येते
४. एकदा समोरच्याचा उधारी फेडण्याचा उद्देश नाही असे लक्षात आल्यावर मग चांगला वकील गाठावा, व फौजदारी आणि दिवाणी कारवाईला सुरुवात करावी.
५. उगाच काठ्या घेऊन हाणामारीला सुरुवात करू नये. आपण व्यावसायिक आहोत, गुंड नाही. कॉलेजमधे गुंडगिरी केली, मारामाऱ्या केल्यात म्हणून पुढेही तोच प्रकार चालून जातो या भ्रमातून बाहेर या. कॉलेज जीवन आणि कॉलेजनंतरचे जीवन यात फरक असतो.
६. कोणतेही व्यवहार करताना लिखापढी ठेवावी. पर्चेस ऑर्डर, बिल, डिलिव्हरी चलन जपून ठेवावेत. बिल ईमेल वर सुद्धा पाठवावे. डिलिव्हरीचे कन्फर्मेशन घ्यावे. उधारीचे पाठपुरवठा तसेच इतर जी काही चर्चा करायची असेल ती ईमेल वर किंवा WhatsApp वर करावी. शक्यतो ईमेल ला प्राधान्य द्यावे.
७. या चर्चेवेळी आपल्याला गरज पडल्यास पुढे कायदेशीर कारवाईत कामी येतील अशा शब्दांचा विचारपूर्वक प्रयोग करावा.
८. सुरुवातीला गोडगोड बोलूनच उधारी वसुलीला प्राधान्य द्यावे. न जमल्यास विनंती करून चेक घेण्याचा प्रयत्न करावा, भलेही तो दूरच्या तारखेचा असेल. आणि हेही जमले नाही तर पुढील कायदेशीर कारवाईचा विचार करावा...
९. व्यवसायात संयमाला पर्याय नाही. इथे चुकीला माफी मिळत नाही. एक चुक सुद्धा व्यवसायाला संपवू शकते. त्यामुळे संयम महत्त्वाचाच आहे.
१०. आपल्याला सगळं कळतं हा विचार कधीच करू नका. योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची मदत नेहमी घ्यावी.

व्यवसाय साक्षर व्हा...

© श्रीकांत आव्हाड

===========
https://www.tg-me.com/+bUyOR79tPHw1N2Y1

मराठी वाचक आणि साहित्य

#पुस्तके #साहित्य #वाचन
बुके बनवून विकण्याचा बिजनेस करणे, हा अतिशय कमी गुंतवणूकीमध्ये करण्याचा बिजनेस आहे. याला फार खर्च लागत नाही.

एखाद्या Sweet shop (मिठाईचे दुकान), Cake Shop च्या आवारात, व्हरांड्यात हा बिजनेस करण्यासाठी तुम्ही जागा मिळवू शकता. त्याचे थोडेफार भाडे दिले की तो दुकानदार तुम्हाला एक टेबल आणि पुष्पगुच्छ बनवण्यासाठी आवश्यक असलेले material ठेवण्यासाठी जागा देऊ शकतात.

लोक आनंदाच्या क्षणी, वाढदिवसाच्या दिवशी, कुणाची भेट घेण्याकरता बुके विकत घेतात. त्यामुळे cake shop, Sweet shop मध्ये येणारे ग्राहक बुके घेण्यासाठी तुमच्याकडे वळू शकतात.

शिवाय गल्लीगल्लीत झालेले युवानेते, भाऊ, दादा, शेठ त्यांच्या आवडत्या नेत्यांना बुके देतच खुश करण्याचा प्रयत्न करत असतात.

बुके कसे बनवायचे , याचे लाखो व्हिडीओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत, तिथून तुम्ही मोफत प्रशिक्षण घेऊ शकता.

हा बिजनेस अत्यंत चालणारा आहे. शिवाय सध्या लोकांना लहान मोठ्या प्रसंगाचा इव्हेंट करण्याची सवय लागली आहे. त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकण्याची लोकांना घाई असते, त्यामुळे सध्याचा काळ बुके विकण्याचा व्यवसाय करण्यासाठी अत्यंत पूरक आहे.

करून तर पाहा.
धक्कादायक! AnyDesk हॅक झाला, युजर्सनी लगेच पासवर्ड बदलावे.
#AnyDeskHacked

मित्रानो, सध्या वापरली जाणारी लोकप्रिय रिमोट डेस्कटॉप ऍप्लिकेशन AnyDesk ची ही सिस्टम हॅक झाल्याचा धक्कादायक वृत्ता समोर आली आहे.

*काय झालं?*

AnyDesk Software GmbH ने शुक्रवारी संध्याकाळी हे कबूल केलं की त्यांच्या प्रोडक्शन सिस्टमवर सायबर हल्ला झाला आहे.

या हल्ल्यामुळे कंपनीची डेटाबेस किंवा इतर संवेदनशील माहिती चोरी झाली का हे अद्याप स्पष्ट नाही.
या हल्ल्याशी संबंधित तपशील कंपनीने अद्याप जाहीर केलेले नाही.

*युजर्स काय करायचं?*

AnyDesk ने युजर्सना तातडीने त्यांचे पासवर्ड बदलण्याची विनंती केली आहे.
29 जानेवारी 2024 रोजी रिलीज झालेलं AnyDesk व्हर्जन 8.0.8 वापरत असाल तर ते अपडेट करा कारण हे नवीन व्हर्जन नवीन सिक्युरिटी सर्टिफिकेटसह येतं.
दुसऱ्या एंटी-व्हायरस सॉफ्टवेअरने तुमचा सिस्टम स्कॅन करा.

*काळजी घ्या!*

जुन्या पासवर्ड पुन्हा वापरू नका आणि मजबूत, युनिक पासवर्ड वापरा.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्षम करा.
फिशिंग ईमेल आणि संशयास्पद लिंक टाळा.

#cybersecurity #dataprotection #staysafeonline
व्यवसाय करणे आणि प्रयोगशाळेत प्रयोग (Experiment) करणे सारखेच आहे :
किती तरी अपयशी प्रयत्नानंतर प्रयोगात यश मिळते. मात्र प्रयत्नांत सातत्य ठेवावे लागते. तेव्हा कुठे प्रयोग यशस्वी होतो.
यश मिळत नाही, साध्य सिध्द होत नाही, तोपर्यंत विविध प्रयोग करतच राहावे लागतात, तेव्हा कुठे 'कधी तरी' यश मिळते. प्रयत्नांत सातत्य ठेवणे हीच व्यवसायातील यशाची गुरुकिल्ली असते. येथे निर्धार फार महत्त्वाचा असतो. साध्याचा पाठपुरावा करणे आवश्यक असते. ते करत करत रोज आपण चुका करत करत उत्तरोत्तर विकसित होत असतो. अनेक गोष्टी केल्यानंतर कळते की हे नव्हते करायचे, पुढे ते टाळले जाते. आधी अंधारात चाचपडत राहावे लागते. मात्र हळूहळू उजेड होऊ लागतो आणि वस्तू लख्ख दिसायला लागतात. आणि मग काय करायचे ते कळते, काय करायचे नाही ते अपयशी प्रयत्नांनी शिकवलेले असतेच.
ज्याला पोहता येत नाही त्याने कुणा पोहता येणाऱ्याच्या देखरेखीखाली तलावात उडी मारली तरी त्याच्या नाकातोंडात पाणी जातेच जाते, त्याला घाबरायला होते. त्याला माहिती नसते की ह्या पाण्याला कसे हाताळायचे. मात्र प्रयत्नाने, प्रशिक्षणाने त्या पोहणे शिकणाऱ्या व्यक्तीला, पाण्याला कसे हाताळायचे, कसे हातपाय मारायचे, विशेष म्हणजे हातपाय कसे नाही मारायचे हे समजते. आणि काहीच दिवसांत ती व्यक्ती उत्तम पोहू लागते.
माझ्या व्यवसायाच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत मागे वळून पाहताना आठवते की मी व्यवसाय मिळवण्यासाठी (मार्केटमधून काम मिळविण्यासाठी) इतके सारे प्रयोग केले आहेत, त्यातले नव्वदपेक्षा जास्त टक्के प्रयोग अयशस्वी झाले आहेत. मात्र एक दोनच प्रयोग यशस्वी झाले नी मला उत्तम काम मिळू लागले, अजूनही मिळत आहे. आजही नवनवीन प्रयोग चालूच असतात.
प्रयत्नांत सातत्य ठेवले म्हणून यश आले. अन्यथा नसते आले.
व्यवसायातील प्रयोग सर्व व्यवसायांसाठी सारखे नसतात. मला जो प्रयोग करून ग्राहक मिळवता आले, ते सारख्याच प्रयोगाने दुसऱ्याला मिळतीलच असे नाही. हे सारे म्हणजे 'मेलडी खाओ, और खुद जान जाओ', असे प्रकरण आहे.
- निलेश अभंग, कल्याण
व्यवसायात Reference ने कामे मिळतात. अधिकाधिक reference ते लोक देतात ज्यांनी आपली Service वा product घेतले आहे. ज्यांना आपल्या सेवेचा वा उत्पादनाचा उत्तम अनुभव आला आहे.
त्यामुळे जो ग्राहक मिळाला आहे, त्याचे उत्तम पद्धतीने काम करून देणे, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे, संपर्कात राहणे (फोन उचलणे) अतिशय महत्त्वाचे आहे.
नवख्या माणसावर कोणी विश्वास ठेवत नाही, ओळखीच्या माणसाला वा कुणी तरी Refer केलेल्या माणसाला लोक काम देतात.
कारण Refer करून काम व्यवस्थित पार पडले तर कोणी शाबासकी देत नाही, मात्र काही चुकीचे झाले की ज्याने Refer केले होते त्याला बोल लावले जाऊ शकतात, की कसा माणूस दिला म्हणून.
आम्ही गेली आठ वर्षे Online Rental agreement ची सेवा देत आहोत, हजारो ग्राहकांना जगभर सेवा दिली आहे, त्यामुळे Reference मधून आणि ज्यांनी याआधी सर्व्हिस घेतली आहे, ते लोक Leave and License registration Service साठी फोन करत असतात. त्यांचे Renewal साठी पुन्हा फोन करणे म्हणजे त्यांना आमचे काम आवडल्याची पोचपावतीच असते.
कामात जरी कधी गैरसमजाने, Communication Error मुळे आमच्या बाजूने काही चूकभूल झाली असली तरी ती आम्ही स्वखर्चाने दुरुस्त करून दिली आहे, अशा वेळी ग्राहकाला टाळत त्याला वाऱ्यावर सोडून दिलेले नाही. कारण आपण त्याला टाळले की आपल्याला तीच सवय लागते आणि मग अशा असंतुष्ट ग्राहकांची साखळी वाढत जाऊन, हीच साखळी आपल्या व्यवसायाचा गळा आवळते, याची आम्हाला कल्पना आहे.
- निलेश अभंग, कल्याण
#businesspost
#randomthoughts
कल्पना करा की २००८ साल चालू आहे. IPL चे पाहिले वर्ष आहे.

महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, रवींद्र जाडेजा हे खेळाडू नसून शेअरमार्केट मधील स्टॉक्स आहेत.

आणि तुम्हाला त्यांच्यापैकी एका स्टॉक मध्ये गुंतवणूक करायची आहे.

तर तुम्ही कोणता स्टॉक निवडणार आणि का ?

निर्णय घेणे तुम्हाला सोपे जावे म्हणून या सर्व खेळाडूंसाठी २००८ मधील IPL मधील त्या त्या संघानी मोजलेली किमंत (Stock Price) सांगतो.

महेंद्रसिंग धोनी - 6 cr

विराट कोहली - 12 Lakh

रोहित शर्मा - 4.8 cr

दिनेश कार्तिक - 2.1 cr

रवींद्र जाडेजा - 10 lakh

पुढे वाचण्यापूर्वी एक गुंतवणूकदार म्हणून यापैकी कोणता शेअर तुम्ही विकत घेणार याचा विचार करा. तुमचे उत्तर ठरले की पुढे वाचा….

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

चला आता तुमचे उत्तर ठरले आहे असे मी समजतो. आता या खेळाडूंना १६ वर्षांनंतर मिळालेली IPL Salary म्हणजे २०२४ ची आकडेवारी पाहूया. थोडक्यात तुम्ही निवडलेला शेअर किती वाढला आहे ते पाहूया.

(लेखापुरता IPL salary गृहीत धरली आहे. प्रत्यक्षात जाहिराती, स्पॉन्सरशिप आणि पार्टनरशिप मधून त्यांची कमाई वेगळी असू शकते. आता सोपं करण्यासाठी केवळ IPL मध्ये त्यांना मिळालेली बोली (IPL Salary) धरूया.)

महेंद्रसिंग धोनी -
2008 - 6 cr
2024 - 12 cr

विराट कोहली -
2008 - 12 Lakh
2024 - 15 cr

रोहित शर्मा -
2008 - 4.8 cr
2024 - 16 cr

दिनेश कार्तिक -
2008 - 2.1 cr
2024 - 5.5 cr

रवींद्र जाडेजा -
2008 - 10 lakh
2024 - 16 cr

सगळ्यात जास्त वाढ कोणत्या शेअर मध्ये दिसली ? तुम्ही निवडलेला शेअर मनाप्रमाणे वाढलेला दिसला का ?

प्रत्येक शेअरची वार्षिक दरवाढ (CAGR) पाहूया -

महेंद्रसिंग धोनी - 4.43%
विराट कोहली - 35.22%
रोहित शर्मा - 7.82%
दिनेश कार्तिक - 6.20%
रवींद्र जाडेजा - 37.33%

IPL मधील सर्वात भरवशाचा खेळाडू महेंद्रसिंग धोनी या शेअरची वाढ FD च्या दरापेक्षा कमी झाली आहे.

विराट कोहली या २००८ मधील नवख्या पण आशादायक खेळाडूने ३५% वार्षिक अशी भरघोस दरवाढ नोंदवली आहे.

रोहित शर्मा या तेव्हाच्या नवख्या पण धडाडीच्या फलंदाजाने सुरुवात तर चांगली केली होती पण पुढे म्हणावी तशी वाढ नोंदवलेली नाही.

दिनेश कार्तिक ची सुरुवात चांगली झाली मात्र सतत टीमच्या आतबाहेर असण्यामुळे त्याला म्हणावी तशी वाढ मिळाली नाही.

रवींद्र जाडेजा सुरुवातीला एकदम नवखा खेळाडू होता , संघात त्याची जागा गोलंदाज म्हणून होती पण प्रयत्नपूर्वक तो एक चांगला अष्टपैलू खेळाडू बनला. आणि टीमसाठीचे त्याचे मूल्य सतत वाढवत नेले त्यामुळे स्वतःचीही किंमत वाढवत नेली. या यादीमधील इतर खेळाडूंपेक्षा सर्वाधिक CAGR वाढ नोंदवत तो एक मल्टिबॅगर खेळाडू बनला.

तर मित्रहो, सांगायचा मुद्दा हा की कोणता स्टॉक किती वाढेल हे कोणीही खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. मोठे चांगले (Blue Chip large Cap) स्टॉक फार वाढतील असे नाही. Growth Stocks वेगाने वाढले तरी ते सातत्याने वाढतील का सांगता येत नाही. आणि मल्टिबॅगर म्हणून ज्यांच्यावर विश्वास ठेवू ते सर्वच लहान स्टॉक वाढतील हे ही सांगता येत नाही.

आणि तरीही वरील सर्व खेळाडू २००८ ते २०२४ पर्यंत खेळले म्हणून खूप Valuable बनले. एवढ्या आव्हानात्मक स्पर्धेत “दीर्घकाळ टिकून राहणे” हेच त्यांचे सगळ्यात मोठे यश आहे.

गुंतवणूकदार म्हणून आपल्याला यापासून काय शिकता येईल ?

Diversified Portfolio -

कोण्या एका जबरदस्त स्टॉकवर पैसे लावणे योग्य नाही. पोर्टफोलिओ आपल्याला या धोक्यापासून वाचवतो. आणि पोर्टफोलिओ बॅलन्सड असेल (Mix of Large cap, Mid Cap, Small Cap, Value & Growth) तरच तो गुंतवणूकदाराला सर्वाधिक फायदा मिळवून देऊ शकतो.

Consistency of Performance

या लेखापुरता आपण १६ वर्षांचा point to point डेटा पहिला. प्रत्यक्षात दर वर्षीचा प्रत्येक स्टॉकचा परफॉर्मन्स पहिला तर प्रत्येक वेळी सर्वाधिक कमाई केलेले शेअर्स वेगळे असतात हे लक्षात येईल. एका वर्षाचा परफॉर्मन्स बघून त्यात गुंतवणूक केली तर त्याच परफॉर्मन्सची पुनरावृत्ती पाहायला मिळेल असे नाही. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये फक्त वाढ न बघता , वाढीतील सातत्य पाहणे अधिक महत्वाचे ठरते !

Risk Analysis

सुरुवातीला भरवशाचे वाटलेले कितीतरी खेळाडू IPL च्या ३-४ हंगामांनंतर दिसेनासे झाले. काहींचा परफॉर्मन्स खराब होता, काहींना दुखापतीने ग्रासले तर काहींचे केवळ नशीब खराब म्हणून निवडच झाली नाही. आपल्या पोर्टफोलिओ मधील काही शेअर्स सोबत पण हेच होऊ शकते. म्हणून शेअरच्या किमतीचा अभ्यास करण्याइतकाच त्यामागील कंपनीचा (Fundamental) अभ्यास करणे देखील आवश्यक ठरते.

Market Conditions
समजा IPL जेवढी चालली तेवढी चाललीच नसती किंवा काही कारणाने IPL चे अर्थकारण गडबडले असते किंवा एखादी टीम बॅन झाली असती तर आपण निवडलेला खेळाडू चांगला असूनही नुकसान झाले असते. म्हणजेच आपल्या गुंतवणुकीला बाहेरील परिस्थीचा फायदा/तोटा होऊ शकतो याची जाणीव ठेवून हुशार गुंतवणूकदाराने शेअर बाजाराबाहेरही गुंतवणूक केली पाहिजे. उदा. रिअल इस्टेट, सोने, debt म्युच्यअल फंड इत्यादी.

IPL ची फायनल कालच संपली आहे. महाराष्ट्रात निवडणुका पण संपल्याच आहेत. आता मोकळा वेळ मिळाला असेल आणि चर्चेचे आवडते विषय संपले असतील….तर जरा गंभीरपणे “पोर्टफोलिओ ऍनालिसिस” करायला घेऊया ! नेटभेटचे फेसबुक पेज, युट्युब चॅनेल आणि व्हाट्सअँप चॅनेल मध्ये याबद्दल बरच शिकायला मिळेल. तुम्हाला फक्त follow करायचं आहे ! कराल ना ?

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Marathi Business ideas - मराठी बिझनेस pinned «तुमची सेविंग 50 हजार पेक्षा जास्त आहे का ?»
जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या शहरात एखादा Business Networking Club जॉईन करा, आवर्जून करा.

आपल्याला व्यावसायिकांचा सहवास मिळतो, त्यातून जे केले पाहिजे ते आपण आपल्या व्यवसायात करत नाही आहोत हे कळते. तिथल्या अनेक व्यवसायिक मित्रांकडून व्यवसायाचे मार्गदर्शन मिळते, मुख्य म्हणजे व्यवसाय (ग्राहक) मिळतो. एकमेकांच्या Reference ने ग्राहक मिळत जातात. अनेकांना अनेक Service Providers तिथे भेटतात. अनेक Service Providers ना ग्राहक तिथे भेटतात. हाती घेतलेले काम जबाबदारीने पार पाडावे लागते. अन्यथा समूहात नाव खराब होऊ लागते, ज्याचा थेट परिणाम इतर सदस्यांकडून मिळणाऱ्या बिजनेसवर होतो.

तिथे आणखी प्रगती करु इच्छिणारे लोक असतात, त्यांच्याकडून ऊर्जा मिळते, आपण कशाबाबतीत मागे आहोत ते समजते. आपल्या व्यवसायात आणखी क्राफ्ट कसा आणता येईल, याचा आपण इतरांच्या व्यवसाय करण्याच्या पद्धती पाहून विचार करू लागतो.

दर आठवड्याला, पंधरा दिवसाला तीस-चाळीस Business Owners ची प्रत्यक्ष भेट होते, अनेक विषयांवर चर्चा करता येते, सल्ला घेता येतो.

शाळा कॉलेजात मुले-मुली एकत्र शिकतात, ते एकमेकांपासून खूप काही शिकत असतात, जे त्यांचे शिक्षकही शिकवत नाहीत वा शिकवू शकत नाहीत, अशा अनेक आवश्यक बाबी ते शिकत असतात. शिवाय लोकांमध्ये (समाजात ) कसे वावरायचे, कसे बोलायचे, काय बोलायचे, काय नाही बोलायचे, कसे वागायचे याचे सारे शिक्षण विदयार्थ्यांना शाळेत, कॉलेजात मिळते, जे Home schooling मध्ये मिळणे शक्यच नाही, (ही Home schooling ची सर्वात कमजोर बाजू आहे) विद्यार्थी निरीक्षणांतून शिकत असतात.

तसेच व्यवसायिकही त्याच्या भोवती व्यवसाय करणारे लोक असतील तर त्यांच्याकडून कळत नकळत खूप काही शिकू शकतो. म्हणून मला असे Networking Platforms खूप महत्त्वाचे वाटतात.

आता माणसं आले तिथे राजकारण हे असणारच आहे. हेवेदावे, रुसणे खुपणे, एखाद्याची नालस्ती करणे हे आलेच. मी हा दोष त्या platform ला देत नाही, माणसं आले की हे सारे उद्योग होणारच. आपण ह्या पृथ्वीवरचा थोर जीव आहोत, ज्याचे प्रमाण आपण कुठेही गेलो की द्यायला विसरत नाही.

तुमचे साऱ्या चाळीस जणांशी मैत्र होणार नाही, मात्र एक-दोघे असे असतील की ज्यांना तुम्ही काही काळाने जिवाभावाचे मित्र म्हणू शकता, कारण आपल्या स्वभावाशी साधर्म्य असणारे लोक कुठल्याही समूहात कमीच असतात, जो तो त्याच्या स्वभावानुसार मित्रमंडळी निवडत असतो.

तुम्हाला प्रगती करावयाची असल्यास तुमचे सर्कल बदलणे, आणखी अद्ययावत सर्कलमध्ये प्रवेश करणे फार गरजेचे असते, जे तुम्हाला अशा नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्समुळे सहज शक्य होते.

मात्र इथे मिळणाऱ्या मोठेपणात वाहवत जाऊ नये. जे वाहवत जातात त्यांचे नुकसान होतेच होते.

थोडक्यात, असे प्लॅटफॉर्म जॉईन करणे हा तसा नफ्याचा सौदा आहे.

- निलेश अभंग, कल्याण

#businesspost
नोकरी करताना अनुभव वाढतो तसा पगार वाढतो. जितक्या जास्त वर्षांचा अनुभव तितका जास्त पगार मिळतो. Experience वाल्या उमेद्वाराला अधिकचा पगार देऊन नोकरीवर घेतले जाते.

असेच व्यवसायात वाढत्या अनुभवाचे खूप सारे फायदे आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कृती केल्यामुळे अनुभवाने काय करायचे नाही ते कळते. अनुभवामुळे आपल्याला व्यक्तींचा फोलपणा लक्षात येतो (ज्यांनी आपल्याला तू व्यवसायात आलास तर कधीही फोन कर, मी तुझ्यासाठी हे करेन, ते करेन अशी आश्वासने दिलेली असतात) आपणही त्यांच्यावर विसंबून राहतो, मात्र अनुभव घेतल्यानंतर कळते की तो उगाच राजकारणी माणसासारखा खोटी आश्वासने देत होता.

शिवाय कोणत्या प्रकारच्या जाहिराती करायच्या, कोणत्या प्रकारच्या नाही करायच्या, कोणते प्लॅटफॉर्म्स वापरायचे, कोणते वापरायचे नाही, आवश्यक लायसन्स कोणते ते सारे समजते.

कमावलेले पैसे कसे जमवायचे, बचत करायचे, शक्य असल्यास कुवतीनुसार लहानमोठ्या गुंतवणुकी करायच्या. (जे पहिल्यांदा व्यवसाय करताना बहुतांशी व्यवसायिक करीत नाहीत, त्यांना वाटते की आपल्याकडे पैशाचा flow असाच कायम राहणार आहे.)

व्यवसायात येणारी लहान सहान अपयशे, अनिश्चितता, नकार पचवण्याचा सराव झालेला असतो. त्यामुळे हाही अनुभव खूप कामी येतो.

अनावश्यक खर्च कसा टाळायचा, हे अनुभवातूनच कळते. अनुभव नसताना व्यवसायिक अंधाऱ्या वाटेतून चाचपडत चालत असतो, मात्र अनुभवरुपी टॉर्चमुळे अंधारातही वाट स्पष्ट दिसते.

एक छोटेसे उदाहरण देतो, मी जवळजवळ चार वर्षे सत्तर whatsapp groups वर रोज वा दिवसाआड माझ्या व्यवसायाच्या जाहिराती टाकायचो, मात्र कधीच एकसुध्दा प्रतिसाद मिळाला नाही. ह्या अनुभवामुळे मी आता ते करणे पुर्णतः टाळतो. मला असे वाटते की WhatsApp Groups मधील लोक तुम्हाला प्रत्यक्ष ओळखत असतील, तुमच्या अधूनमधून भेटीगाठी होत असतील तरच तुम्हाला ह्या WhatsApp advertisement चा उपयोग होऊ शकतो.(तुमचा अनुभव वेगळा असू शकतो)

अनुभवामुळे सराव होतो, सरावामुळे आपला प्रवास परिपूर्णतेकडे व्हायला सुरुवात होते, त्यामुळे व्यवसायात यशाच्या शक्यताही वाढतात.

नोकरी असो वा व्यवसाय वा जीवन अनुभवाचे खूप मोठे योगदान असते.

- निलेश अभंग, कल्याण

#businesspost
2024/08/04 12:58:11
Back to Top
HTML Embed Code: